Chetan Zadpe
मुख्यमंत्री म्हणून रेणुका सिंह यांच्या नावाची लवकरच घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
छत्तीसगडमधील ताकदवान नेत्या मानल्या जातात. नुकतीच त्यांनी भरतपूर सोनहाटमधून विधानसभा निवडणूक जिंकली आहे.
छत्तीसगडमधील भाजपच्या आमदारांची लवकरच बैठक होणार आहे. या बैठकीनंतर त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे.
2003 मध्ये रेणुका सिंह सुरगुजा विभागातील रामानुजनगर विधानसभेतून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. भाजपच्या फायर ब्रँड नेत्या अशी ओळख आहे.
आमदारकीच्या काळात राज्य मंत्रिमंडळात त्या महिला आणि बालविकास राज्यमंत्री होत्या.
2019 मध्ये सुरगुजा लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा खासदार झाल्या. त्यानंतर रेणुका सिंह यांची मोदी सरकारमध्ये केंद्रीय आदिवासी व्यवहार राज्यमंत्रिपदी वर्णी लागली.
समर्थकांकडून पूजाअर्चा-
भाजपचे कार्यकर्ते आणि त्यांच्या समर्थकांनी त्यांची मुख्यमंत्रिपदावर निवड होण्यासाठी ठिकठिकाणी पूजाअर्चा सुरू केली आहे.
राज्यातील नेते तसेच केंद्रीय पातळीवरील विविध नेत्यांचा त्यांना पाठिंबा असल्याचे दिसून येते.