Deepak Kulkarni
डॉ. बालाजी किणीकर हे अंबरनाथचे शिवसेनेचे आमदार आहेत.
आळंदीहून निघालेली ज्ञानेश्वर माऊलींची पालखी शुक्रवारी जेजुरीत मुक्कामी आहे.
रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ माध्यमातून माऊली ट्रस्टचे डॉक्टरांच्या 'डॉक्टर दिंडी'सोबत आमदार डॉ. बालाजी किणीकर वारकऱ्यांची सेवा करत असतात.
ते दरवर्षी आषाढी वारीत सहभागी होत असतात.
कार्यकर्ते आणि रोटरी क्लबच्या सदस्यांसह ते वारीत दाखल झाले.
जेजुरी येथे वारीत सहभागी होत त्यांनी वारकऱ्यांची अनोखी सेवा केली.
यावेळी मेडिकल कॅम्पमध्ये वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांची आरोग्य तपासणी केली.
वारीत पायी चालून वारकऱ्यांच्या पायात गोळे येत असल्याने आणि पाय दुखत असल्यानं आमदार बालाजी किणीकर यांनी वारकऱ्यांच्या पायाची मालिश करुन दिली.
किणीकरांची ही वारकऱ्यांची सेवा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.