सरकारनामा ब्युरो
नागपूर येथे १६ एप्रिल रोजी महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा पार पडली. यावेळी आघाडीतील नेत्यांनी समर्थकांना हात उंचावून अभिवादन केले.
छत्रपती संभाजीनगर येथे एका खुर्चीवरून टीका झाली होती. त्यामुळे नागपुरच्या सभेत सर्वांना एकसारख्याच खुर्च्या होत्या.
भाजप प्रवेशाच्या चर्चा असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र ते बोलले नाहीत.
सभेला विदर्भातून शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाबरीबाबत केलेल्या वक्तव्यावरून भाजपचा समाचार घेतला.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यासह केंद्र सरकारवर सडकून टीका केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला.
सभेत शिवसेनेचे नितीन देशमुख, काँग्रेसचे सुनील केदार आणि राष्ट्रवादी पक्षाचे अनिल देशमुख यांनी भाषणे केली.