CM योगी आदित्यनाथ यांनी खरेदी केलं 100 कोटींचं हेलिकॉप्टर; 'ही' आहेत जबरदस्त फिचर्स

Amit Ujagare

व्हीआयपी अलर्ट

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर देशभरातली नेते, व्हीआयपी हवाई प्रवासाबाबत अलर्ट झाले आहेत.

Yogi Adityanath

सर्वाधिक सुरक्षित

यातच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही आता जगातील सर्वात सुरक्षित मानले जाणाऱ्या हेलिकॉप्टरची खरेदी केली आहे. ऑगस्टा वेस्टलँड AW139 हे अत्याधुनिक हेलिकॉप्टर त्यांच्या ताफ्यात सामील झाले आहे.

Augusta Westland

उडणारा किल्ला

सुरक्षिततेच्या दृष्टीने हे हेलिकॉप्टर एखाद्या 'उडाण करणाऱ्या किल्ल्या'सारखं मानलं जातं. इटलीच्या लिओनार्डो कंपनीकडून हे हेलिकॉप्टर खरेदी करण्यात आलं आहे.

Augusta Westland

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड AW139चा वापर जगभरात केवळ व्हीआयपी प्रवासासाठीच नाही, तर पोलीस कारवाई आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवांसाठीही केला जातो.

Yogi Adityanath

वेग आणि पल्ला

हे हेलिकॉप्टर ताशी ३१० किमी वेगाने उडू शकते आणि एकावेळी १ हजार किमीपर्यंतचा प्रवास करू शकते.

Augusta Westland

बैठक व्यवस्था

यामध्ये १५ प्रवासी बसू शकतात, परंतू व्हीआयपी प्रवासासाठी यात केवळ ६ ते ८ सीट्स ठेवून सोय अधिक आरामदायी केली आहे.

Augusta Westland

किंमत

या आलिशान आणि सुरक्षित हेलिकॉप्टरची किंमत सुमारे १०० कोटी रुपये आहे.

Augusta Westland

जगभर मागणी

आजच्या काळात नेत्यांच्या दौऱ्यांची संख्या वाढली आहे, त्यामुळे जगभरात या हेलिकॉप्टरला मागणी आहे.

Yogi Adityanath