Uday krishna reddy : UPSC पास होत घेतला अपमानाचा बदला, राजीनामा दिलेल्या हवालदाराची प्रेरणादायी कहानी

Roshan More

पीआयकडून अपमान

उदय कृष्ण रेड्डी हे 2013 ते 2018 या काळात पोलिस हवालदार होते. मात्र, पीआयने सगळ्या पोलिस दलासमोर उदय यांचा अपमान केला.

Uday krishna reddy | sarkarnama

नोकरीचा राजीनामा

पीआयने केलेला अपमानामुळे दुखी झालेल्या उदय यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला.

Uday krishna reddy | sarkarnama

IAS होण्याचे स्वप्न

उदय यांना IAS व्हायचे होते. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्या नंतर यूपीएससीची तयारी सुरू केली.

Uday krishna reddy | sarkarnama

तब्बल चार प्रयत्न

उदय यांनी चार वेळा यूपीएससीची परीक्षा दिली. चौथ्या प्रयत्नात उदय पास झाले.

Uday krishna reddy | sarkarnama

IRS

2023 मध्ये झालेल्या यूपीएससीच्या परीक्षेचा निकाल एप्रिल 2024 मध्ये जाहीर झाला. यात उदय यांची रँक 780 होती. त्यामुळे त्यांना IRS होण्याची संधी आहे.

पुन्हा परीक्षा देणार

उदय यांचे IAS होण्याचे स्वप्न आहे. त्यामुळे यूपीएससी पास झाले असले तरी IAS होण्यासाठी ते पुन्हा परीक्षा देणार आहेत.

Uday krishna reddy | sarkarnama

संघर्षातून यश

उदय कृष्ण रेड्डी हे आंध्र प्रदेश पोलिस दलात हवालदार म्हणून नोकरी करत होते. मात्र, नोकरीचा राजीनामा देत त्यांनी अथक कष्ट आणि संघर्षातून यश मिळवले.

Uday krishna reddy | sarkarnama

NEXT : विधानसभा रणसंग्रामातील मनसेचे सात शिलेदार

MNS Candidate | sarkarnama
येथे क्लिक करा