सरकारनामा ब्यूरो
आयएएस अनुराग कुमार हे मुळचे बिहारमधील कटिहार येथील आहेत.
अनुराग हे दहावीपर्यंत अभ्यासात तितके हुशार नसल्यामुळे वर्गातील बॅकबेंचवर बसून, दंगा मस्ती करत असत.
दहावीनंतर रात्रंदिवस अभ्यास करून बारावीमध्ये त्यांनी 90 टक्के गुण मिळवले.
पदवीचे शिक्षण घेत असताना त्यांना अभ्यासात बऱ्याच अडचणी येत असल्यामुळे त्यांचे विषय राहिले होते.
जिद्द आणि चिकाटीच्या बळावर त्यांनी अधिक मेहनतीने पदवी आणि पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केले.
शिक्षण पूर्ण करताच त्यांनी यूपीएससीची तयारी सुरू केली आणि स्वतः बनवलेल्या नोट्सचा अभ्यास केला.
2017 मध्ये पहिल्या प्रयत्नांत त्यांनी 677 वी रँक मिळवत परीक्षा उत्तीर्ण केली.
मिळालेल्या रँकमध्ये समाधानी न राहता त्यांनी पुढच्या वर्षी दुसऱ्या प्रयत्नात 48 वी रँक मिळवत आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले.
अनुराग कुमार हे सध्या बिहार येथील बेतिया जिल्ह्याचे सहायक अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.