Rajanand More
डोनाल्ड ट्रम्प हे जानेवारी महिन्यात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सुत्रे हाती घेणार आहेत. त्यासाठी त्यांनी विविध विभागांमध्ये भारतीय वंशाच्या तज्ज्ञांच्या नियुक्त्या केल्या आहेत.
भारतीय वंशाचे जय भट्टाचार्य यांच्यावर ट्रम्प यांनी राष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या संचालकपदाची मोठी जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.
भट्टाचार्य यांचा जन्म 1968 मध्ये कोलकाता येथे झाला होता. मात्र, ते अमेरिकेत स्थायिक झाले आणि तिथेच शिक्षणही पूर्ण केले. त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातील वैद्यकीय शिक्षण घेतले आहे.
जगातील नामांकित अर्थशास्त्रज्ञांमध्ये भट्टाचार्य यांचे नाव घेतले जाते. सध्या ते अमेरिकेत नॅशनल ब्यूरो ऑफ इकोनॉमिक्स रिसर्चमध्ये कार्यरत असून स्टॅनफोर्ड स्कूल ऑफ मेडिसिनमध्ये प्राध्यापक आहेत.
ट्रम्प यांनी ज्या विभागाची जबाबदारी सोपवली आहे त्याचे वार्षिक बजेट तब्बल 47.3 अब्ज डॉलर एवढे आहे. त्यामुळे भट्टाचार्य यांच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे.
भट्टाचार्य यांनी कोरोना काळात अमेरिकेतील आरोग्य धोरणांवर सडकून टीका केली होती. यावेळी ते सरकारच्या निशाण्यावर आले होते.
NIH च्या संचालकपदी नियुक्ती झाल्यानंतर भट्टाचार्य यांनी आनंद व्यक्त केला. अमेरिकेतील वैज्ञानिक आणि रोग्य संस्थांमध्ये सुधारणा करून लोकांचा पुन्हा विश्वास संपादन करू, असे त्यांनी म्हटले आहे.
जय भट्टाचार्य हे रॉबर्ट एफ. केनेडी ज्युनियर यांच्यासोबत महत्वपूर्ण संशोधनासाठी काम करून आरोग्य क्षेत्रात सुधारणा आणतील आणि लोकांना सुरक्षित करतील, असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे.