IAS Durga Shakti Nagpal : नावाप्रमाणेच सशक्त महिला अधिकारी IAS 'दुर्गा'...

Rashmi Mane

दुर्गा

नावाप्रमाणेच दुर्गा असणाऱ्या सक्षम अधिकारी दुर्गा शक्ती नागपाल या यूपी केडरच्या 'आयएएस' अधिकारी आहेत. त्या सध्या उत्तर प्रदेश मधील बांधा जिल्हाच्या जिल्हा दंडाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

IAS Durga Shakti Nagpal | Sarkarnama

कामगिरी

'यूपीएससी' परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांची पंजाब केडरमध्ये नियुक्ती झाली. कर्तव्याच्या दीड वर्षातच त्यांनी जमीन घोटाळा उघडकीस आणला. त्यानंतर ग्रेटर नोएडामध्ये वाळू माफियांवर कारवाई केली.

IAS Durga Shakti Nagpal | Sarkarnama

जन्म

IAS अधिकारी दुर्गा शक्ती नागपाल यांचा जन्म 25 जून 1985 रोजी छत्तीसगडच्या रायपूर जिल्ह्यात झाला.

IAS Durga Shakti Nagpal | Sarkarnama

शिक्षण

दुर्गा शक्ती नागपाल यांनी 2007 मध्ये इंदिरा गांधी दिल्ली टेक्निकल युनिव्हर्सिटीमधून संगणक अभियांत्रिकीमध्ये पदवी प्राप्त केली. त्यानंतर दुर्गा नागपालने 'यूपीएससी' परीक्षेची तयारी सुरू केली.

IAS Durga Shakti Nagpal | Sarkarnama

20 रँक मिळवत परीक्षा उत्तीर्ण

2008 मध्ये त्यांनी नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांची भारतीय महसूल सेवेसाठी निवड झाली होती. त्यानंतर दुर्गा शक्ती नागपाल यांनी 2009 मध्ये सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा 20 वा क्रमांक मिळवत उत्तीर्ण झाल्या.

IAS Durga Shakti Nagpal | Sarkarnama

पंजाब कॅडरमध्ये नियुक्ती

UPSC परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर दुर्गा शक्ती नागपाल यांना पंजाब कॅडर देण्यात आले आणि त्यांची मोहाली येथे नियुक्ती करण्यात आली.

IAS Durga Shakti Nagpal | Sarkarnama

वाळू माफियांवर कारवाई

ग्रेटर नोएडामध्ये पोस्टिंगच्या वेळी आयएएस दुर्गा शक्ती नागपाल यांनी वाळू माफियांवर कारवाई केली. अवैध उत्खननाविरोधात कारवाई करताना त्यांनी १५ जणांना अटक केली होती. तसेच 24 डंपर ट्रक आणि 300 ट्रॉली जप्त करण्यात आल्या होत्या.

IAS Durga Shakti Nagpal | Sarkarnama

पती देखील 'आयएएस' अधिकारी

दुर्गा नागपालचा विवाह अभिषेक सिंगसोबत झाला आहे, ते 2011 च्या बॅचचे 'आयएएस' अधिकारी आहेत. सिंग यांच्याशी विवाह झाल्यानंतर दुर्गा शक्ती नागपाल यांनाही यूपी कॅडर मिळाले.

IAS Durga Shakti Nagpal | Sarkarnama

Next : जाणून घ्या, भारताच्या 15व्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे खरे नाव ?

येथे क्लिक करा