सरकारनामा ब्यूरो
तमिळनाडू केडर चे IPS दाम्पत्य आहे ज्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ एकाच वेळी मिळाले आहे कोण आहे, हे दाम्पत्य जाणून घेऊयात...
वंदिता पांडे आणि वरुण कुमार असे या IPS दाम्पत्याचे नाव असून हे दोघे 2011च्या बॅचचे तमिळनाडूचे अधिकारी आहेत.
वंदिता पांडे यांना दिंडीगुल रेंज येथे पोलिस उपमहानिरीक्षक म्हणजेच DIG पद देण्यात आले आहे, तर पती वरुण कुमार यांना त्रिचीचे DIG बनवण्यात आले आहे. आधी एसपी म्हणून तैनात होते.
तमिळनाडू सरकारने काही दिवसापूर्वी 60 IPS अधिकाऱ्यांची बढती केली आहे त्यापैकीचं एक हे दाम्पत्य आहे.
वंदिता पाडे या उत्तर प्रदेश प्रयागराज येथील रहिवासी आहेत. त्या त्यांच्या धडाकेबाज कामगिरीबरोबरच राहणीमान आणि लुक्स मुळे चर्चेत असतात.
वरुण कुमार हे तमिळनाडू चे रहिवासी असून त्यांनी कॅम्पियन उच्च माध्यमिक विद्यालय, त्रिचीतून प्राथमिक शिक्षण तर चेन्नईतील रागास डेंटल कॉलेजमधून बीडीएस पूर्ण केले आहे.
ऑगस्ट महिन्यात हे दाम्पत्य प्रचंड चर्चेत आलं होतं. त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टवर बेशिस्त आणि आक्षेपार्ह कमेंट करण्यात आल्या होत्या.
IPS वरुण कुमार आणि वंदिता पांडे यांनी तमिळनाडूतील राजकीय पक्षाचे NTK (नाम तमिलर कच्ची) नेते आणि चित्रपटसृष्टीतील अभिनेता सीमा यांना नोटीस पाठवत दिवाणी आणि फौजदारी मानहानीसाठी जबाबदार धरण्यात आले होतं.