सरकारनामा ब्यूरो
वसंतदादा पाटील यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील पदमाळे या लहानशा खेड्यात 13 नोव्हेंबर 1917 रोजी झाला.
क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक ते विधायक कार्य करणारे, पक्ष संघटना वाढवणारे राजकीय नेते आणि प्रभावी मुख्यमंत्री असा त्यांचा थक्क करणारा प्रवास आहे.
सहकारमहर्षी ते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांचा आज (1 मार्च ) स्मृतिदिन.
मंत्रीपदाच्या काळात त्यांनी राज्यासाठी अनेक चांगले निर्णय घेतले. त्यांच्या कामामुळे आजही जनमाणसात त्यांचे स्थान कायम आहे.
1952 ते 1972 या काळात महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात त्यांनी मोठी क्रांती घडवली.
अगदी लहान वयात त्यांनी (१९३०) मध्ये स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला.
सहकार क्षेत्रातील त्यांच्या अभूतपूर्व कामगिरीमुळे 1967 मध्ये त्यांना पद्मभुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
वैद्यकीय, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे व तंत्रनिकेतन विद्यालये विनाअनुदान तत्वावर स्थापन करण्याच्या त्यांच्या निर्णयाने, शैक्षणिक क्षेत्रात मोठी क्रांती घडली. त्यामुळेच ग्रामीण भागातील विद्यार्थांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्या.