सरकारनामा ब्यूरो
मुंबईतील अंधेरी परिसरात शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीने वीर सावरकर गौरव यात्रा आयोजित करण्यात आली होती.
या यात्रेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार गजानन किर्तीकर, भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलार उपस्थित होते.
या यात्रेत स्वयंस्फूर्तीने हजारो सावरकरप्रेमी नागरिक सहभागी झाले.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विचार सर्वदूर पोहोचवण्याच्या उद्देशाने ही 'वीर सावरकर गौरव यात्रा' आयोजित करण्यात आली.
एकनाथ शिंदे यांनी यावेळी नागरिकांशी संवाद साधला.