Deepak Kulkarni
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सशस्त्र क्रांतीचा हुंकार पेरणारे आद्य क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज (दि.२८) १४० वी जयंती आहे.
वीर सावरकर गौरव दिन आज दिल्लीतील महाराष्ट्र सदनात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला.
पहिल्यांदाच महाराष्ट्र सदनमध्ये पहिल्यांदाच सावरकर जयंती साजरी करण्यात आली आहे.
सावरकर यांची जयंती दिल्लीतील महाराष्ट्र सदनात साजरा केला जाणे ही गोष्ट अत्यंत अभिमानास्पद असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
महाराष्ट्र सदनाला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली आहे.
राज्यासह देशात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा मुद्दा गाजत असताना भाजप आणि शिवसेनेनं सावरकर गौरव यात्रा काढली होती.
याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, उपस्थित होते.
नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाच्या पहिल्या टप्प्यानंतर नरेंद्र मोदी आणि भाजपच्या खासदारांनी जुन्या संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये जमून वीर सावरकरांना अभिवादन करण्यात आली.