YS Sharmila : मुख्यमंत्र्यांच्या बहिणीने लगावली पोलिसांच्या कानशिलात; कोण आहेत वाय.एस.शर्मिला?

Ganesh Thombare

मुख्यमंत्र्यांची बहीण

वाय.एस.शर्मिला या माजी मुख्यमंत्री वाय.एस.आर.रेड्डी यांची मुलगी तर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस.जगमोहन रेड्डी यांच्या बहीण आहेत.

YS Sharmila | Sarkarnama

पक्षाची स्थापना

वाय.एस.शर्मिला यांनी 8 जुलै 2021 ला वायएसआर तेलंगणा हा नवा पक्ष स्थापन करत राजकारणात पाऊल ठेवलं.

YS Sharmila | Sarkarnama

जोरदार तयारी

2023 मध्ये होणाऱ्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाय.एस.शर्मिला यांनी आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे.

YS Sharmila | Sarkarnama

सक्रीय राजकारणात

वाय.एस.शर्मिला या आता सक्रीय राजकारणात उतरल्या असून त्यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांना थेट आव्हान दिलं आहे.

YS Sharmila | Sarkarnama

राज्यभर पदयात्रा

वाय.एस.शर्मिला यांनी तेलंगणा राज्यातील जनतेशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेत राज्यभर पदयात्रा केली.

YS Sharmila | Sarkarnama

दक्षिणेत नवीन नेतृत्वाचा उदय

शर्मिला यांनी पक्ष स्थापन करत राजकारणात एन्ट्री केल्यामुळे दक्षिणेच्या राजकारणात एका नवीन नेतृत्वाचा उदय झाला आहे.

YS Sharmila | Sarkarnama

पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की

वाय.एस.शर्मिला यांनी एका आंदोलनादरम्यान पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

YS Sharmila | Sarkarnama

पुन्हा एकदा चर्चेत

वाय.एस.शर्मिला यांचा पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शर्मिला पुन्हा चर्चेत आल्या आहेत.

YS Sharmila | Sarkarnama

Next : सुषमा स्वराज आणि बासुरी स्वराज यांच्यातील अनोखे नाते, पाहा खास फोटो!

Sarkarnama