अनुराधा धावडे
पाकिस्तानवर भारताच्या विजयानिमित्त, 16 डिसेंबर हा दिवस देशभरात 'विजय दिवस' म्हणून साजरा केला जातो.
या युद्धात पाकिस्तानचा दारुण पराभव झाला आणि पाकिस्तानने आपल्या 93 हजार सैनिकांसह भारतीय सैन्यासमोर शरणगती पत्करली.
1971 च्या युद्धात सुमारे 3,900 भारतीय जवान शहीद झाले होते आणि सुमारे 9,851 जखमी झाले होते.
03 डिसेंबर 1971 रोजी भारत-पाकिस्तान युद्ध सुरू झाले. जे तब्बल 13 दिवस चालले.
यावेळी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी मध्यरात्री देशाला संबोधित करताना पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याची माहिती देत युद्धाची घोषणाही केली होती.
या युद्धावेळी फील्ड मार्शल सॅम होर्मुसजी फ्रामजी जमशेदजी माणेकशॉ हे भारतीय लष्कर प्रमुख होते.
माणेकशॉ नेतृत्वाखालीच भारताने हे युद्ध लढले आणि ऐतिहासिक विजय मिळवला.
धर्माच्या आधारे भारतापासून वेगळे झालेल्या पश्चिम पाकिस्तानने तत्कालीन पूर्व पाकिस्तानवर पाशवी अत्याचार केले.
पुर्व पाकिस्तानला या अत्याचारातून मुक्त करण्यासाठी भारत या युद्धात सामील झाला आणि आजच्याच दिवशी पाकिस्तानातून बाग्लांदेश विभक्त झाला.
इतकेच नाही तर भारतीय लष्कराच्या शौर्यामुळे 16 डिसेंबर 1971 रोजी जगाच्या नकाशावर बांगलादेशच्या रूपाने एका नव्या देशाचा जन्म झाला.
तेव्हापासून भारत दरवर्षी 16 डिसेंबर रोजी विजय दिवस साजरा करतो.