Jagdish Patil
दाक्षिणात्य अभिनेता सुपरस्टार थलापती विजयच्या टीव्हीके पक्षाकडून काल तामिळनाडूमधील करूर येथे भव्य रॅलीचं आयोजन केलं होतं.
या रॅलीमध्ये अनपेक्षित गर्दी झाल्यामुळं मोठी चेंगराचेंगरी झाली ज्यामध्ये जवळपास 38 जणांचा मृत्यू तर 100 जण जखमी झालेत.
या गर्दीचे धडकी भरवणारे आणि अंगावर शहारा आणणारे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
मृतांच्या नातेवाईकांना तामिळनाडू सरकारने प्रत्येकी 10 लाख आणि जखमींना 1 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
तामिळनाडू सरकारने या घटनेची चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय तपास आयोग नेमला आहे.
तर विजयने या दुर्घटनेवर दु:ख व्यक्त करत चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 20 लाखांची मदत देणार असल्याचं सांगितलं आहे.
प्रत्यक्षदर्शींनी प्रमाणापेक्षा जास्त लोक जमले आणि गर्दीला नियंत्रित करण्यासाठी काहीही उपाययोजना न केल्यामुळे लोक गुदमरल्याचं सांगितलं.
विजयला रॅलीला पोहोचण्यास 7 तास उशीर झाला आणि आयोजकांना 10 हजार लोक येतील अशी अपेक्षा असताना 27000 लोक या रॅलीत सहभागी झाल्यामुळे चेंगराचेंगरी झाली.
कडक उन्हात लोकांकडे पुरेसं अन्न आणि पाणी नव्हतं अशातच चेंगराचेंगरी झाल्यामुळे लोकांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, या घटनेवर मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे.