Roshan More
निवडणूक आयोगाने मतदार नोंदणी करणाऱ्या नागरिकांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ऑनलाइन पद्धतीमध्ये आता 'फॉर्म ६' (Form 6) भरताना नियमांत मोठा बदल करण्यात आला आहे.
नवीन नियमांनुसार आता नवीन अर्जदारांना फॉर्म भरताना आपल्या आई-वडिलांची माहिती देणे अनिवार्य असेल. पालकांची माहिती दिल्याशिवाय मतदारांचा अर्ज पुढील प्रक्रियेसाठी सबमिट होणार नाही.
जर अर्जदाराने आपल्या पालकांची आवश्यक माहिती ऑनलाइन फॉर्ममध्ये भरली नाही, तर अर्ज तिथेच अडकेल. ही माहिती अपूर्ण राहिल्यास ऑनलाइन अर्ज प्रणालीत पुढे सरकणार नाही.
नवीन नियमावलीत 'विशेष गहन पुनर्निरीक्षण' प्रक्रियेशी संबंधित माहिती देणे आवश्यक केले आहे. मतदार यादी अधिक अचूक आणि पारदर्शक करण्यासाठी ही प्रक्रिया राबवली जात आहे.
अर्जात पालकांची माहिती जोडल्यामुळे मतदारांची खरी ओळख पटवणं निवडणूक आयोगाला अत्यंत सोपे होणार आहे. यामुळे मतदार यादीतील संभाव्य चुका आणि बोगस नोंदणी रोखण्यास मदत होईल.
या नवीन नियमांमुळे मतदारांची पडताळणी प्रक्रिया अधिक मजबूत आणि सुटसुटीत होईल, असा विश्वास आयोगाने व्यक्त केला आहे. सुरक्षा आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी हा कायदेशीर बदल करण्यात आला आहे.
निवडणूक आयोगाच्या या नवीन कायदेशीर निर्णयावर कायदेतज्ञ आणि अभ्यासकांनी मात्र काही शंका उपस्थित केल्या आहेत. पालकांची माहिती अनिवार्य करण्याच्या या अटीवर सध्या तज्ञांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.