होळी स्पेशल : AI मुळे रेल्वे वेटिंग लिस्ट होणार इतिहासजमा!

Amit Ujagare

होळीनिमित्त गर्दी

यंदा होळीनिमित्त प्रवाशांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी भारतीय रेल्वेनं नवी रणनीती आखली आहे.

Indian Railway AI

AIचं सहकार्य

तिकीट विक्री, रेल्वेचे मार्ग निश्चित करणे आणि स्टेशनवर गर्दीच्या नियंत्रणासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच (AI) सहकार्य घेतलं जाणार आहे.

Indian Railway AI

वेटिंगपासून दिलासा

रेल्वेचा दावा आहे की, या AI तंत्रज्ञानाच्या मदतीनं प्रवाशांना लांब रांगा आणि वेटिंगपासून दिलासा मिळणार आहे.

Indian Railway AI

रिअल टाइम विश्लेषण

उत्तर रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी हिमांशू शेखर उपाध्याय यांनी सांगितलं की, कोणत्याही रेल्वे स्थानकात असुविधेची स्थिती निर्माण होता कामा नये. यासाठी AI च्या माध्यमातून रिअल टाइम विश्लेषण केलं जात आहे.

Indian Railway AI

विशेष गाड्या

तसंच गरज पडल्यास केवळ अर्ध्या तासात विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळं प्रवाशांना तात्काळ दिलासा मिळेल.

Indian Railway AI

प्रवाशी संख्येचं विश्लेषण

होळीच्या सणानिमित्त नवी दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवर यंदा विशेष होल्डिंग एरिया तयार करण्यात आला आहे, इथं हायरिझोल्युशन कॅमेरे लावण्यात आले आहेत. जे अनारक्षित प्रवाशांच्या संख्येचं सातत्यानं विश्लेषण करत आहेत.

Indian Railway AI

रिअल टाइम विश्लेषण

या कॅमेऱ्यांतून मिळणाऱ्या डेटाच्या आधारवार AI सिस्टिम गर्दीचं रिअल टाइम विश्लेषण करते, याद्वारेच गाड्यांची संख्या, वेळ आणि व्यवस्थापनाची योजना निश्चित केली जाते. यामुळं अचानक वाढणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळवता यावं.

Indian Railway AI

तिकीट विक्रीचा डेटा AI कडं

दिल्ली स्टेशनवर तिकीट विक्रीचा पूर्ण डेटा थेट AI सिस्टिमला पाठवला जातो त्यानुसार ज्या मार्गासाठी सर्वाधिक अनारक्षित तिकीट विक्री होत आहे. त्याच बाजुला गाड्यांची संख्या आणि फ्रिक्वेन्सी वाढवली जात आहे.

Indian Railway AI

गर्दीनुसार गाड्या सुटणार

म्हणजेच आता रेल्वे गाड्या या निश्चित वेळेनुसार न सोडता प्रवाशांची मागणी आणि गर्दीच्या आकडेवारीच्या आधारावर सोडल्या जाणार आहेत. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास तो महाराष्ट्रात विशेषतः मुंबईत जिथं लोकल गाड्यांसाठी तुफान गर्दी असते तिथं राबवला जाऊ शकतो.

Indian Railway AI