IAS Deepak Rawat : 'शून्य' तुम्हाला काय शिकवतो? याचे उत्तर देत बनले 'आयएएस' अधिकारी, 'यूट्यूब'वर आहेत चार लाखांपेक्षा जास्त सब्‍सक्राइबर !

Rashmi Mane

IAS दीपक रावत

IAS दीपक रावत सध्या कुमाऊंमध्ये विभागीय आयुक्त म्हणून कार्यरत आहेत.

Deepak Rawat | Sarkarnama

शिक्षण

IAS दीपक रावत यांचा जन्म 24 सप्टेंबर 1977 ला उत्तराखंडमधील मसुरी येथे झाला. मसुरीच्या सेंट जॉर्ज कॉलेजमधून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले आहे.

Deepak Rawat | Sarkarnama

कुटुंब

दीपक रावत यांचे वडील शेतकरी होते. बारावीत दीपकला विज्ञान शाखे ऐवजी कला विषयात शिक्षण घ्यायचे होते, पण आई-वडिलांच्या दबावामुळे त्यांना विज्ञान शाखेतून शिक्षण घ्यावे लागले. रावत यांनी अभियांत्रिकीमध्ये पदवी घेतली.

Deepak Rawat | Sarkarnama

लहानपणी व्हायचे होते भंगारवाला

रावत यांना लहानपणी जुनी घड्याळे, पॉलिशचे रिकामे बॉक्स आणि टूथब्रश जमवण्याची आवड होती. एका मुलाखतीत त्याने सांगितले की, लहानपणी त्याला 'भंगारवाला' बनायचे होते. इतकंच नाही तर लहानपणी त्यांना इलेक्ट्रॉनिक गॅजेट्समध्येही खूप रस होता.

Deepak Rawat | Sarkarnama

प्रेरणा

IPS अनिल कुमार रातुरी हे मसुरीमध्ये दीपक रावत यांच्या शेजारी राहत होते. त्यांच्याकडून त्यांना आयएएस बनण्याची प्रेरणा मिळाली.

Deepak Rawat | Sarkarnama

अभियांत्रिकी शिक्षणादरम्यान UPSC ची तयारी

दिल्लीतील महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान, दीपक रावत यांनी आपल्या बॅचमेट्ससह UPSC परीक्षेची तयारी सुरू केली. मग त्यांनी पत्रकारिता हा बॅकअप करिअरचा पर्यायही निवडला.

Deepak Rawat | Sarkarnama

नोकरी

दीपक २४ वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांनी त्याचे पॉकेटमनी बंद केले. त्यानंतर 'जेआरएफ' परीक्षेत यश मिळवल्यानंतर त्यांनी 8000 रुपये प्रति महिना पगारावर केली पहिली नोकरी.

Deepak Rawat | Sarkarnama

रँक

दीपक रावत यांना पहिल्या दोन प्रयत्नांत अपयश आले. रावत यांनी तिसऱ्यांदा परीक्षा दिली त्यात त्यांची 'आयआरएस' म्हणून निवड झाली. त्यानंतर 2007 मध्ये त्यांनी पुन्हा परीक्षा दिली त्यात 12 व्या रँकसह ते 'आयएएस' अधिकारी बनले.

Deepak Rawat | Sarkarnama

लोकप्रिय अधिकारी

रावत सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहेत. यूट्यूबवर त्यांचे ४० लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

Deepak Rawat | Sarkarnama

Next : शरद पवारांच्या मर्जीतला नेता ते राष्ट्रवादीचे 'नवे प्रदेशाध्यक्ष' जाणून घ्या सुनील तटकरेंचा राजकीय प्रवास...

येथे क्लिक करा