Rashmi Mane
नाशिक जिल्हातील बोरीचीबारी इथे महिलांना हंडाभर पाण्यासाठी जीव धोक्यात घालावा लागतो.
अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या मतदारसंघातील हा भाग आहे. पण पाणीटंचाईची समस्या अजूनही तशीच आहे.
गुजरात सीमेलगतचा हा भाग दर उन्हाळ्यात टंचाईने होरपळतो. पावसाळ्यात भरून वाहणाऱ्या नद्या काही महिन्यांतच ओसाड होतात.
झरी आणि अन्य नद्या भरून वाहतात… पण त्यांचं पाणी गुजरातकडे वळतं. नाशिकचा हा भाग मात्र कोरडाच राहतो.
गोदावरी खोऱ्यात पाणी वळवण्यासाठी अनेक वर्षांपासून घोषणा चालू आहेत. पण प्रकल्पांना केंद्राची मंजुरी नाही.
विशेष म्हणजे या विभागाशी संबंधित जलसंपदा विभाग येथील पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याच अत्याधित राहिलेला आहे.
आरोप आहेत की भाजप गुजरातच्या दबावाखाली आहे. पाणी गुजरातला वळवण्यामागे पडद्यामागे डावपेच सुरू आहेत.
वर्षानुवर्षे फक्त घोषणा – कृती शून्य. या भागाला खरंच न्याय कधी मिळणार?