Amit Ujagare
पश्चिम बंगालमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला असून ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे.
ऋतब्रता बॅनर्जी यांनी ८० पैकी ६० आमदारांना सोबत घेऊन वेगळा गट स्थापन केला असून त्याला विधानसभा अध्यक्षांनी मान्यता दिली आहे.
यानंतर विधानसभा अध्यक्षांनी ऋतब्रता बॅनर्जी यांची पश्चिम बंगाल विधानसभेत विरोधीपक्ष नेते म्हणून नियुक्ती केली. त्यामुळं हा ममता बॅनर्जींसाठी मोठा धक्का आहे.
महाराष्ट्रातील शिवसेना फोडून सगळा पक्ष ताब्यात घेणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणं ऋतब्रता बॅनर्जी यांनी कृती केली आहे. त्यांची ओळख काय आहे? जाणून घेऊयात.
ऋतब्रता बॅनर्जी यांचा जन्म कोलकात्यात १५ नोव्हेंबर १९७९ रोजी झाला असून सध्या ते ४७ वर्षांचे आहेत. कलकत्ता विद्यापीठातून त्यांनी इंग्रजी साहित्यात एमए केलं.
सुरुवातीला मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीमध्ये ते सक्रीय होते. SFIचे जनरल सेक्रेटरी म्हणून विद्यार्थी राजकारणातून त्यांना प्रसिद्धी मिळाली. २०१७ मध्ये त्यांची पक्षविरोधी कारवायांसाठी पक्षातून हाकालपट्टी करण्यात आली.
त्यानंतर २०१८च्या आसपास ऋतब्रता बॅनर्जी हे TMC मध्ये सामील झाले. पक्षाच्या ट्रेड युनियन wingचं प्रमुखपद त्यांच्याकडं ममता बॅनर्जींनं दिलं. त्यानंतर दोन वेळा त्यांची राज्यसभेवर निवड झाली
२०२६ च्या विधानसभा निवडणुकीत उलुबेरिया पूर्व (हावडा) मतदारसंघातून ते पहिल्यांदाच आमदार झाले. त्यानंतर १ जून २०२६ रोजी संदीपान साहा यांच्यासह त्यांची पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी ममता बॅनर्जींनी हाकालपट्टी केली.