Rashmi Mane
कोकणातील प्रस्तावित रिफायनरीला हद्दपार करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू सोलगाव येथे हजारो स्थानिकांचे आंदोलन सुरु आहे.
कोकणात राजापूर बारसू सोलगाव परिसरात क्रूड ऑइल रिफायनिंग करणारी 'रत्नागिरी रिफायनरी व पेट्रोलियम उद्योग' प्रस्तावित आहे.
इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या देशातील तीन प्रमुख तेल कंपन्या या प्रकल्पाचा भाग असतील.
आखाती देशांच्या सौदी अरमाओ आणि ANDOC जॉइंट या दोन मोठ्या कंपन्याही या प्रकल्पाचा भाग असणार आहेत.
रिफायनरी प्रकल्प आशियातील सर्वात मोठ्या रिफायनरी प्रकल्पांपैकी आहे.
या प्रकल्पामुळे जमिनी धोक्यात येतील तसेच मासेमारी, सागरी जैवविविधतेवर परिणाम होण्याची भीती रहिवाशांना आहे.
रिफायनरीमुळे होणाऱ्या प्रदुषणामुळे आंबा, काजू, नारळ, सुपारीच्या बागांवरही परिणाम होईल असे आंदोलकांचे म्हणणे आहे.
राजापूर तालुक्यातील बारसू येथे 3 हजार 400 एकर जमिनीवर क्रूड रिफायनरीचा प्रकल्प प्रस्तावित आहे.