Modi Government 3.0 : मोदी सरकारमध्ये महाराष्ट्रातील मंत्र्यांना कोणती मंत्रालये!

Vijaykumar Dudhale

नितीन गडकरी : रस्ते वाहतूक आणि महामार्ग

नितीन गडकरी यांच्याकडे त्यांचे आवडीचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय पुन्हा सोपविण्यात आले आहे. यापूर्वीही ते त्यांच्याकडे होते.

Nitin Gadkari | Sarkarnama

पियूष गोयल : वाणिज्य व उद्योग

पियूष गोयल यांच्याकडेही यापूर्वी असलेले वाणिज्य मंत्रिपद पुन्हा देण्यात आलेले आहे. या वेळी वाणिज्यसोबत उद्योग मंत्रालयाचा भारही त्यांच्यावर असणार आहे.

Piyush Goyal | Sarkarnama

रामदास आठवले : सामजिक न्याय आणि सबलीकरण

रामदास आठवले यांना केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा संधी देताना त्यांच्या सामजिक न्याय आणि सबलीकरण विभाग देण्यात आलेला आहे. मागील पंचवार्षिकमध्ये हेच मंत्रालय आठवलेंकडे होते.

Ramdas Athawale | Sarkarnama

रक्षा खडसे : युवक कल्याण व क्रीडा

रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांच्याकडे युवक कल्याण आणि क्रीडा विभागाचे राज्यमंत्रिपद देण्यात आलेले आहे.

Raksha khadse | Sarkarnama

मुरलीधर मोहोळ : सहकार, नागरी हवाई वाहतूक

पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना सहकार आणि नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचे राज्यमंत्रिपद सोपविण्यात आलेले आहे.

Murlidhar Mohol | Sarkarnama

प्रतापराव जाधव : आयुष, आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालय

शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडे आयुष, आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाचा कारभार सोपविण्यात आला आहे. ते या खात्याचे स्वतंत्र कार्यभार असलेले राज्यमंत्री आहेत.

Prataprao Jadhav | Sarkarnama

चंद्रकांत पाटील पाटील : जलशक्ती मंत्रालय

मूळचे जळगावचे मात्र गुजरातमधील नवसारीमधून निवडून आलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ऊर्फ सी. आर. पाटील यांच्याकडे जलशक्ती मंत्रालय असणार आहे.

C. R. Patil | Sarkarnama

ज्योतिरादित्य सिंधिया : दूरसंचार, ईशान्य भारत विकास मंत्रालय

ज्योतिरादित्य सिंधिया यांचे पूर्वज हे महाराष्ट्रातील आहेत. ते मध्य प्रदेशातील गुना लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांच्याकडे दूरसंचार आणि ईशान्य भारत विकास मंत्रालयाची कमान असणार आहे.

Jyotiraditya M Scindia | Sarkarnama

शेतकऱ्याची मुलगी झाली उपजिल्हाधिकारी; जाणून घ्या प्रियल यादवची सक्सेस स्टोरी

Priyal Yadav | Sarkarnama