Rashmi Mane
किती टोल आहे, किती भरले गेले, जमा किती झाले हे सगळं लोकांसमोर येईल, यासाठी दोन्ही बाजूंनी बोर्ड लावले जातील.
टोल नाक्यांवर तैनात असणारे कर्मचारी उर्मट असतात. त्यांच्याऐवजी सरकारी यंत्रणेचे कर्मचारी तिथे असावेत.
टोल नाक्यांच्या परिसरातील नागरिकांना सवलतीच्या दरांमध्ये पास देण्यात यावेत.
मुंबई एन्ट्री पॉइंट, वांद्रे सीलिंक, एक्स्प्रेसवेवरील टोलची कॅगतर्फे चौकशी केली जावी.
टोल नाक्यांवर फास्ट टॅग चालला नाही, त्यामुळे दोनदा टोल कपात झाल्यास याबद्दल तक्रार करता यावी.
ठाणेकरांनी आनंदनगर किंवा एरोली टोल नाक्यांवर एकदाच टोल भरावा.
पुढील 15 दिवस वाहने मोजण्यासाठी सरकार आणि मनसे मुंबईतील सर्व एन्ट्री पॉइंट्सवर कार कॅमेरे लावणार.
करारातील नमूद केलेल्या सर्व सोयीसुविधा, स्वच्छ प्रसाधनगृह, प्रथमोपचार एक रुग्णवाहिका या गोष्टी टोल नाक्यांवर असतील. तसेच सर्व उड्डाणपुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं जाईल.
ठाण्याला झालेली टोलवाढ रद्द करण्याच्या दृष्टीने सरकारला महिनाभराचा अवधी पाहिजे. त्यासंदर्भात महिनाभरात निर्णय घेतला जाईल.
राष्ट्रीय महामार्गावर जर रस्ते खराब असतील, तर त्या ठिकाणचा टोल रद्द करण्यात यावा.
यलो लाइनच्या पुढे वाहनांच्या रांगा गेल्या, तर टोल आकारला जाऊ नये.