Rashmi Mane
चीन आणि पाकिस्तानमध्ये मजबूत व्यापार संबंध आहेत. चला पाहूया चीन नेमकं काय काय पाकिस्तानकडून खरेदी करतो.
पाकिस्तानमधून चीन मोठ्या प्रमाणात कापड, वस्त्रे व कातडीच्या वस्तू आयात करतो.
आंबे, संत्री, डाळी आणि तांदूळ यासारखी कृषी उत्पादने चीनमध्ये मोठ्या प्रमाणात निर्यात केली जातात.
कोळसा, तांबे, मीठ व रासायनिक पदार्थ चीनकडे निर्यात होतात.
मासे, कोळंबी आणि इतर समुद्री अन्न चीनच्या बाजारात मागणी असलेल्या वस्तू आहेत.
गेल्या काही वर्षांत पाकिस्तानमध्ये गाढवांची संख्या वाढली आहे, ज्यामुळे चीनला त्यांचा पुरवठा शक्य झाला आहे. खरंतर, चीनमध्ये गाढवाच्या कातडीला आणि मांसाला मोठी मागणी आहे.
हस्तकलेच्या वस्तू, पारंपरिक शोपीस आणि सजावटीचे साहित्यही चीनमध्ये विकले जाते.
या कॉरिडॉरमुळे व्यापार वाढला असून, वस्तूंचा वाहतूक मार्ग सुलभ झाला आहे.