MVA Rally In Mumbai : महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेतलं 'मानापमान' नाट्य...

Deepak Kulkarni

वज्रमूठ सभा

महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा मुंबईतील बीकेसी मैदानावर पार पडली.

MVA Rally In Mumbai | sarkarnama

मतभेदाची चर्चा..

या सभेत आघाडीच्या नेत्यांमध्ये काही मतभेद झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

MVA Rally In Mumbai | sarkarnama

आक्षेप

वज्रमूठ सभेच्या व्यासपीठावरील वेगवेगळा पोडियम ठेवण्यात आल्यामुळे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी त्यावर आक्षेप घेतला.

MVA Rally In Mumbai | sarkarnama

आधी साधा पोडियम

महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत आधी साधा पोडियम पाहायला मिळाला.

MVA Rally In Mumbai | sarkarnama

साध्या पोडियमवरून कोण बोललं?

साध्या पोडियमवरून आदित्य ठाकरे, संजय राऊत, भाई जगताप, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाषणं केली.

MVA Rally In Mumbai | sarkarnama

सजवलेला पोडियम

पण त्यानंतर फुलांनी सजवलेला एक वेगळा पोडियम व्यासपीठाच्या मध्यभागी ठेवण्यात आला.

MVA Rally In Mumbai | sarkarnama

अजितदादांची समजूत

अजित पवार यांनी आक्षेप घेतल्यानंतर आदित्य ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांनी त्यांची समजूत घातली.

MVA Rally In Mumbai | sarkarnama

व्यासपीठावरच कुजबूज...

सभेच्या व्यासपीठावरच जवळपास पाच ते दहा मिनिटे पोडियमवरून कुजबूज सुरू होती.

MVA Rally In Mumbai | sarkarnama

तीन भाषणालाच सजवलेला पोडियम का?

शेवटच्या तीन भाषणालाच फक्त फुलांनी सजवलेला पोडियम का? असा सवाल आता राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात येत आहे.

MVA Rally In Mumbai | sarkarnama

NEXT : शरद पवार यांची मोठी घोषणा अन् नेत्यांना अश्रू अनावर....