Rashmi Mane
1920 : भारताचे दहावे राष्ट्रपती के. आर. नारायणन यांचा जन्म. 1992 मध्ये त्यांची उपराष्ट्रपतिपदी निवड झाली. अनुसूचित जातीतील व्यक्तीची निवड होणारे ते प्रथम उपराष्ट्रपती होत. अत्यंत बुद्धिमान विद्यार्थी, शिक्षक, पत्रकार, यशस्वी राजदूत, लेखक, संशोधक, खासदार, मंत्री अशा विविध भूमिका त्यांनी समर्थपणे पार पाडल्या. "नॉन अलायनमेंट ऑफ कॉन्टेम्पररी इंटरनॅशनल रिलेशन' आणि "इंडिया ऍन्ड अमेरिका ः एसेज इन अंडरस्टॅंडिंग' हे दोन ग्रंथही त्यांच्या नावावर आहेत.