गड-किल्ल्यांना युनेस्कोचा दर्जा मिळाल्यानंतर काय मिळणार आंतरराष्ट्रीय सुविधा?

Amit Ujagare

12 किल्ल्यांच्या समावेश

महाराष्ट्राचं वैभव असलेल्या 12 गडकिल्ल्यांचा UNESCO जागतिक वारसास्थळ म्हणून नुकतीच मान्यता मिळाली. “Maratha Military Landscapes of India” या शिर्षकाखाली ही वारसास्थळं ओळखली जाणार आहेत.

Rajgad

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा

यामुळं आता या किल्ल्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये विविध उपायोजना, आंतरराष्ट्रीय पातळीवरील फायदे मिळणार आहेत.

Shivneri

जागतिक मानकं

किल्ल्यांच्या संरक्षणासाठी जागतिक Outstanding Universal Value (OUV) मानकांची अंमलबजावणी करण्यात येईल. यामध्ये संशोधन, संरक्षण आणि पुनर्बांधणीचा समावेश आहे.

Salher

अवैध बांधकाम बंदी

या किल्ल्यांजवळील २५ किलोमीटर परिसरात अवैध बांधकाम बंदी आणि गावांचा नियंत्रित विकास करण्यात येईल.

Panhalgad

संवर्धनासाठी मदत

UNESCO च्या आदेशांनुसार, जागतिक वारसा तज्ज्ञ किल्ल्यांचे वारंवार निरीक्षण करतील, ज्यामुळं किल्ल्यांच्या संवर्धनासाठी मदत होईल.

Pratapgad

पायाभूत सुविधा

किल्ल्यांपर्यंत चांगले रस्ते, सार्वजनिक शौचालये, सुरक्षा-व्यवस्था, भोजनालयं आणि सुरक्षित पार्किंग यांसहित व्यापक पायाभूत सुविधा विकसित केल्या जातील.

Khanderi

स्थानिकांना रोजगार

गावातील रहिवाशांना प्रशिक्षित गाईड बनवणे, माहिती केंद्र उभारणे आणि पर्यटन उद्योगाशी जोडणं यामुळं शक्य होईल.

Vijaydurg

अर्थव्यवस्थेला गती

आंतरराष्ट्रीय पातळीवरील फायद्यांमध्ये पर्यटनात वाढ, सुविधा सुधारल्यानं देशविदेशातील पर्यटकांचं आकर्षण वाढेल, यामुळं स्थानिक अर्थव्यवस्थेला गती मिळेल.

Sindhudurg

आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचं मार्गदर्शन

आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचं मार्गदर्शन लाभेल, यामध्ये UNESCO व ICOMOS चे तज्ज्ञ सल्ला व निरीक्षण देतील.

Suvarnadurg

तुलनात्मक अभ्यासासाठी प्रेरणा

तुलनात्मक अभ्यासासाठी प्रेरणा मिळेल. जागतिक स्तरावर इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर आणि संरक्षण तंत्राबद्दल संशोधन, अ‍ॅकॅडमिक चर्चेला चालना मिळेल.

Jinji