Amit Ujagare
ई-बाईक टॅक्सी ही इलेक्ट्रिक (बॅटरीवर चालणारी) दुचाकी वापरून चालवली जाणारी टॅक्सी सेवा आहे. यात सामान्य बाईकप्रमाणे एकाच प्रवाशाला घेऊन जायची परवानगी असते. ही सेवा मुख्यतः शहरातील छोट्या अंतराच्या प्रवासासाठी सोयीची आणि स्वस्त आहे.
महाराष्ट्र सरकारने ई-बाईक टॅक्सी सेवेला मंजुरी दिली आहे. 2025 मध्ये "Maharashtra Bike-Taxi Rules, 2025" नोटिफाईड करण्यात आलं आहे. सुरुवातीला MMR रिजनमध्ये याची सुरुवात झाली. त्यानुसार, Uber, Rapido, Ola सारख्या कंपन्यांना तात्पुरते परवाने देण्यात आले होते.
1 ऑगस्ट 2026 पासून अॅप-आधारित बाईक टॅक्सी सेवांना पूर्णपणे कायदेशीर रूप देण्यात येत आहे. ड्रायव्हरसाठी महाराष्ट्र डोमिसाइल प्रमाणपत्र अनिवार्य असणार आहे. ही सेवा १ लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्येच उपलब्ध होणार आहे.
फक्त इलेक्ट्रिक बाईक्स, बाईक पिवळ्या रंगाचीच, बाईकवर 'Bike Taxi' लिहिलेलं असणार, GPS, इन्शुरन्स, रेन कव्हर (पावसाळ्यात) अनिवार्य.
ई-बाईक टॅक्सी चालकाचं वय साधारण 20 ते 50 वर्षे, त्याच्याकडं वैध कमर्शिअल ड्रायव्हिंग लायसन्स + PSV बॅज अनिवार्य, फक्त 12 वर्षांवरील प्रवाशीच परवानगी असणार आहे.
ई-बाईक टॅक्सीची ट्रिप ही जास्तीत जास्त 15 किमीपर्यंतच असणार, ड्रायव्हर आणि प्रवाशी यांच्यात फिजिकल पार्टीशन अनिवार्य (महिलांच्या सुरक्षेसाठी), यलो हेल्मेट (प्रत्येक ट्रिपनंतर सॅनिटाईज करावं लागणार), अॅग्रीगेटरकडे किमान 50 ई-बाईक्स असाव्यात.
पहिल्या 1.5 किमीसाठी ₹15, नंतर प्रति किमी सुमारे ₹10.27 इतकं भाडं RTO कडून निश्चित करण्यात आलं आहे. ही सेवा ऑटो/टॅक्सीपेक्षा स्वस्त आणि जलद आहे.
ड्रायव्हर्सचे कामाचे तास हे दिवसाला 8 तास इतकेच असणार, कंपन्यांना लायसन्स फी + सिक्युरिटी डिपॉझिट द्यावं लागणार, महिलांसाठी महिला ड्रायव्हरचा पर्यायही उपलब्ध होऊ शकतो.