Rashmi Mane
अनेक दिवसांपासूनचा गोळीबार, ड्रोन हल्ले आणि लष्करी कारवाईनंतर, भारत- पाकिस्तान या दोन्ही देशांनी युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे. दोन्ही देशांच्या सैन्याने सीमेवरील सर्व लष्करी हालचाली थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
पण युद्धबंदी म्हणजे काय? भारत-पाकिस्तानमध्ये यावरूनच झाला समझौता...
युद्धबंदीला सीजफायर असेही म्हणतात. कोणतेही युद्ध कायमचे किंवा तात्पुरते थांबवण्याचे एक साधन आहे. याअंतर्गत, दोन्ही पक्ष सीमेवर कोणतीही आक्रमक कारवाई न करण्याचे वचन देतात. हा दोन्ही देशांमधील औपचारिक करार मानला जाऊ शकतो.
युद्धविराम (Ceasefire) म्हणजे दोन किंवा अधिक संघर्षरत पक्षांमध्ये युद्ध किंवा हिंसक कारवायांना तात्पुरते किंवा कायमस्वरूपी थांबविण्याचे करार होय.
युद्धविरामासाठी बऱ्याचदा दोन्ही देश परस्पर संमतीने हा निर्णय घेतात. या करारानंतर जर कोणत्याही पक्षाने सीमेवर आक्रमक कारवाई केली तर त्याला युद्धबंदीचे उल्लंघन म्हटले जाते.
स्वातंत्र्यानंतर 1947 मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये काश्मीरसाठी युद्ध झाले. परिस्थिती शांत करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांना हस्तक्षेप करावा लागला. यामुळे 1949 मध्ये भारत आणि पाकिस्तानने परस्पर संमतीने जम्मू आणि काश्मीरवर युद्धविराम रेषा स्थापित केली.
मानवी जीवनाचे (सैनिक आणि नागरिक दोघांचेही) रक्षण करणे.
संवाद आणि शांतता प्रक्रियेला संधी देणे.
तणाव कमी करण्यासाठी आणि कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी.
आंतरराष्ट्रीय दबावाला प्रतिसाद देण्यासाठी
या संघर्षविरामामुळे सीमावर्ती भागातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
तथापि, तणाव पूर्णपणे निवळलेला नाही आणि दोन्ही देश सतर्क आहेत.