Amit Ujagare
यंदा मे महिन्यात सुरुवातीपासूनच तापमानानं अत्यंत रौद्र रुप धारण केलं होतं. पण आता हेच तापमान आणखी तीव्र होत जातं, त्याला 'नवतापा' असं म्हणतात. हा काळ नेमका कोणता असतो हे बऱ्याच जणांना माहिती नसतं ते आता पाहुयात.
मुळात नवतापा म्हणजे सर्वाधिक तापमानाचे नऊ दिवस. सूर्य जेव्हा रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो, तेव्हापासून पुढचे नऊ दिवस हा कालावधी असतो. यंदा हा कालावधी २५ मे ते २ जून असा असणार आहे.
सूर्यानं रोहिणी नक्षत्रात प्रवेश केल्यानंतर तो पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ असतो, त्यामुळं सूर्याची किरणं ही थेट जमिनीवर पडत असतात. यामुळं तापमानात प्रचंड वाढ होते, हे तापमान ४५ अंश डिग्रीच्या पुढेची जाऊ शकते, जे मनुष्याबरोबरच इतर पशू-पक्षांनाही सहन होण्यापलिकडे असते.
हवामानाच्या बदलत्या पद्धतींनुसार आपल्याकडं काही ठोकताळे किंवा समजुती तयार झाल्या आहेत. त्यानुसार, जेवढा हा नवतापा कडक असेल तेवढा मॉन्सूनचा पाऊस चांगला पडत असतो.
शेतकऱ्यांसाठी मात्र नवतापाचा काळ हा महत्वाचा असतो कारण या नऊ दिवसांच्या सर्वाधिक तीव्र उन्हाच्या काळात नांगरणी केलेल्या शेतातील हानिकारक कीटक नष्ट होतात, त्यामुळं जमिनीचा पोत सुधारतो.
नवतपाताच्या काळात दिवस हा मोठा असल्यानं सकाळी लवकरत ते संध्याकाळनंतर अंधार पडेपर्यंत उष्णतेची लाट येऊन उन्हाच्या तीव्र झळा जाणवू शकतात. दिवसभर जमीन तापलेली असल्यानं आणि तिच्या स्वभावाप्रमाणं ती उशीरा थंड होत असल्यानं रात्रभर उकाडा जाणवू शकतो.
यामुळे उष्माघाताचा मोठा धोका असतो तो टाळण्यासाठी खालील गोष्टींची खबरदारी घेणे आवश्यक आहे. भर दुपारी १२ ते ४ या वेळेत उन्हातून फिरण टाळायला हवं, भरपूर पाणी पिणे, लिंबूपाणी, ताक, नारळपाणी असे पदार्थ घेणं गरजेचं आहे.
८) बाहेर पडताना चेहरा चांगल्या प्रकारे झाकून घेणे, डोक्यावर टोपी घालणे, सुती आणि सैलसर कपडे वापरा ज्यामुळं शरिराला हवा खेळती राहील. कलिंगड, काकडी यासारख्या थंड फळांचा आहारात समावेश करणं गरजेचं आहे.