सरकारनामा ब्यूरो
IPS भारतीय पोलिस विभागात अनेक अधिकारी वेगवेगळ्या पदावर तैनात असतात. याच सेवेत सगळ्यात मोठी पोस्ट कुठली असते,ठाऊक आहे का तुम्हांला..?
IPS सेवेत सहाय्यक पोलिस अधीक्षक(एसपी), पोलिस उपअधीक्षक (डीएसपी), पोलिस महानिरीक्षक (आईजी), पोलिस उपमहानिरीक्षक (डीआईजी), पोलिस महासंचालक (डीजीपी) अशा पोस्ट असतात.
IPS सेवेच्या पोस्टमध्ये बऱ्याच वेळेला कन्फ्यूजन होते. आयपीएस अधिकाऱ्यांची भरती पोलिस उपअधीक्षकांकडून केली जाते.
IPS सेवेतील सगळ्यात मोठी पोस्ट ही पोलिस महासंचालक (डीजीपी) ची आहे.
डीजीपी हे राज्याच्या पोलिस दलांचे प्रमुख असून त्यांच्यावर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची महत्त्वाची जबाबदारी असते.
IPS होण्यासाठी लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) ची परीक्षा देणे आवश्यक असते.
राज्य आणि केंद्र शासित प्रदेशामध्ये सर्वोच्च रँकचे IPS अधिकारी असतात.
IPS बनल्यानंतर लगेच डीजीपी या पदावर बदली केली जात नाही. त्यासाठी 20 ते 25 वर्ष इतका कामाचा अनुभव असावा लागतो. डीजीपी पदाची नियुक्ती ही कॅबिनेटद्ववारे केली जाते.