'जंतर-मंतर'चा इतिहास काय? इथं कुठली महत्वाची आंदोलन झाली

Amit Ujagare

कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळं सध्या दिल्लीचं जंतर-मंतर हे ठिकाण चर्चेत आहे. पण आता याचा आंदोलनस्थळाचा दर्जा काढून घेण्यात आल्यानं त्याची जास्तच चर्चा होत आहे.

Jantar Mantar

हे ठिकाण चर्चेत असलं तरी जंतर-मंतर नेमकं काय आहे? या नावाचा इतिहास आणि इथल्या मैदानावर यापूर्वी कोणती ऐतिहासिक आंदोलनं झाली याचा आढावा घेऊयात.

Jantar Mantar

जंतर-मंतर ही वेधशाळेची वास्तू आहे. जयपूरचे महाराजा सवाई जयसिंह द्वितीय यांनी मुघल सम्राट मुहम्मद शाहच्या आदेशानुसार १७२४ मध्ये ही बांधली.

Jantar Mantar

त्यावेळी दिल्ली, जयपूर, उज्जैन, वाराणसी आणि मथुरा या पाच ठिकाणी वेधशाळा बांधण्यात आल्या, त्यापैकी दिल्लीची जंतर-मंतर एक जुनी इमारत आहे.

Jantar Mantar

कनॉट प्लेस, संसद भवन मार्ग परिसरात ही वेधशाळा असून 'सम्राट यंत्र', 'जयप्रकाश यंत्र', 'राम यंत्र', 'मिश्र यंत्र' अशी एकूण १३ यंत्रे इथं आहेत, हे स्थळ आता संरक्षित स्मारक आहे.

Jantar Mantar

या वास्तूच्या शेजारील रस्ता आणि फूटपाथला (टॉलस्टॉय मार्ग ते अशोका मार्ग) जंतर-मंतर आंदोलनस्थळ असं संबोधतात. १९९३ मध्ये याला अधिकृत आंदोलनस्थळ म्हणून मान्यता मिळाली. या ठिकाणी कलम १४४ लागू न करण्याची प्रथा आहे.

Jantar Mantar

जंतर-मंतरवर आजवर अनेक महत्वाची आंदोलनं झाली आहेत. अण्णा हजारे लोकपाल (भ्रष्टाचार) विरोधी आंदोलन (२०११), निर्भया न्यायासाठी आंदोलन (२०१२), वन रँक-वन नेशन आंदोलन (२०१५), तामिळनाडूच्या शेतकऱ्यांचं दुष्काळा संबंधीच आंदोलन.

Jantar Mantar

नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) विरोधी आंदोलन (२०१९), किसान संसद (तीन कृषी कायद्यांविरोधात) आंदोलन (२०१९), कुस्तीपटूंचं (साक्षी मलिक, विनेश फोगाट आणि बजरंग पुन्या) आंदोलन (२०२३) यांसह इतरही अनेक आंदोलनं इथं पार पडली आहेत.

Jantar Mantar