सरकारनामा ब्यूरो
राष्ट्रध्वज म्हणजे देशाचे प्रतीक. राष्ट्रध्वज हा जगभरातील देशाची वेगळी ओळख दर्शवतो. आपला राष्ट्रध्वज देखील असाच खास आहे.
आपला राष्ट्रध्वज केवळ शांतता आणि बंधुभाव प्राधान्य दर्शवत नाही, तर भारतीय संस्कृतीचा महान वारसा देखील जगासमोर ठेवतो.
आपल्या भारतीय झेंड्यात तीन रंग प्रामुख्याने आहेत. ध्वजात तीन समान आडव्या पट्ट्यांची रचना करण्यात आली आहे.
वरच्या भागात गडद केशरी रंग आहे. या रंगातून त्याग, धैर्य याचा बोध होतो.
मधल्या भागात पांढरा रंग आहे.या रंगातून प्रकाशाचा आणि सत्यमार्गाचा शांती, सत्य, आणि पावित्र्याचा बोध होतो.
ध्वजाच्या खालील भागात गडद हिरवा रंग आहे. हा रंगातून निसर्गाशी वा भूमीशी असलेले नाते दर्शवितो, निष्ठा व समृद्धीचा बोध होतो.
निळ्या रंगाचे अशोकचक्र हे सागराप्रमाणे अथांगता आणि कालचक्राचे त्यासोबत बदलत जाणाऱ्या जगाची आठवण करून देतो.
गतिमान जीवन असावे आणि भारतीयांनी शांततापूर्ण आगेकूच करावी असा संदेश अशोकचक्र देतो.