Rashmi Mane
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाच मोठे निर्णय घेतले आहेत.
त्यामध्ये भारतीय नागरिक पाकिस्तानात असतील तर त्यांनी १ मे पर्यंत माघारी याव असं आवाहन करण्यात आले आहे.
पण पाकिस्तानात किती हिंदू राहतात? हे तुम्हाला माहीत आहे का?
या निर्णयामुळे पाकिस्तानातील हिंदू नागरिकांमध्ये चिंता आणि संभ्रम निर्माण झाला आहे.
पाकिस्तान या राष्ट्राची निर्मिती मूळातच धार्मिक आधारावर झाली त्यामुळे येथील बहुतांश लोकसंख्या इस्लाम धर्माचा अनुनय करते, म्हणजेच हा देश मुस्लिम बहुल आहे.
पाकिस्तान मुस्लिम बहुल देश असला तरी येथे हिंदू लोकसंख्याही लक्षणीय आहे.
2023 च्या जनगणनेनुसार, पाकिस्तानमधील हिंदू लोकसंख्या सुमारे ५.२ मिलियन (५२ लाख) इतकी आहे, जी एकूण लोकसंख्येच्या २.१७% आहे .
पाकिस्तानमधील हिंदू समुदाय मुख्यतः सिंध प्रांतात वस्तीला आहे. येथे उमरकोट आणि थारपारकर जिल्हे हे हिंदू बहुसंख्य असलेले आहेत, जिथे निवडणुकीत हिंदू मतदारांची संख्या ४५% ते ४९% पर्यंत आहे .