Ganesh Thombare
राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षपदी प्रफुल्ल पटेलांची नियुक्ती झाल्याने ते चर्चेत आहेत. त्यांचा राजकीय प्रवास जाणून घेऊयात.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली.
प्रफुल्ल पटेल हे शरद पवारांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय मानले जातात.
प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रवादीचा मोठा चेहरा मानलं जातं.
प्रफुल्ल पटेल यांचे वडील मनोहरभाई पटेल हे मोठे उद्योगपती होते.
राजकारणात प्रवेश करताच प्रफुल्ल पटेल हे 1985 मध्ये गोंदिया पालिकेचे नगराध्यक्ष झाले.
1991 मध्ये पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवली आणि खासदार झाले.
2009 मध्ये त्यांनी चौथ्यांदा लोकसभेची निवडणूक जिंकली अन् ते सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री झाले.
प्रफुल्ल पटेल हे आत्तापर्यंत चार वेळा लोकसभा आणि तीन वेळा राज्यसभेचे खासदार झाले आहेत.