सरकारनामा ब्युरो
सत्यपाल मलिक यांचा जन्म 24 जुलै 1946 रोजी उत्तर प्रदेशमधील बागपतमध्ये झाला. विज्ञान शाखेमधून पदवी मिळवून त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले.
सत्यपाल मलिक यांचा राजकीय प्रवास काँग्रेस, समाजवादी पार्टी आणि नंतर भारतीय जनता पक्ष असा आहे.
भारतीय क्रांति दलाकडून 1974 मध्ये सत्यपाल मलिक बागपतचे आमदार झाले.
ते 1984 मध्ये काँग्रेसमध्ये सहभागी होऊन राज्यसभेचे खासदार बनले. बोफोर्स घोटाळ्याच्या आरोपानंतर 1987 मध्ये मलिक काँग्रेस पक्षातून बाहेर पडले.
जनता दल पक्षाकडून 1989 मध्ये मलिक अलीगढमधून खासदार बनले.
सत्यपाल मलिक 2004 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला.
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी 2012 मध्ये त्यांची निवड झाली. 2017 मध्ये बिहार राज्याचे राज्यपाल बनले.
2018 मध्ये मलिक जम्मू-कश्मीर के राज्यपाल बनले. त्यांच्या कारकीर्दीमध्ये ३७० कलम हटवले.