Rashmi Mane
अयोध्येतील राम मंदीरच्या खटल्यावर निकाल देणारे पाच न्यायमूर्ती आज कोणत्या पदावर? जाणून घेऊया.
न्यायमूर्ती रंजन गोगोई हे १७ नोव्हेंबर २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयातून सरन्यायाधीशपदावरून निवृत्त झाले. निवृत्त झाल्यानंतर चार महिन्यात त्यांना राष्ट्रपतींनी राज्यसभेवर 'खासदार' म्हणून नियुक्ती झाली.
न्यायमूर्ती 'शरद बोबडे' हे २३ एप्रिल २०२१ सरन्यायाधीशपदावरून निवृत्त झाले. ते महाराष्ट्रातील 'नॅशनल लॉ युनिव्हर्सटी'चे कुलगुरू आहेत.
न्यायमूर्ती 'डी.वाय. चंद्रचूड' यांनी भारताच्या सरन्यायाधीश म्हणून नोव्हेंबर २०२२ मध्ये पदभार स्वीकारला होता.
न्यायमूर्ती 'अशोक भूषण' जुलै २०२१ रोजी निवृत्त झाले. त्यांनंतर चार महिन्यांनी त्यांना 'नॅशनल कंपनी लॉ अपीलीय ट्रिब्यूनल'चे चेअरमन करण्यात आले.
न्यायमूर्ती 'अब्दुल नजीर' जानेवारी २०२३ मध्ये निवृत्त झाले. एका महिन्यानंतर त्यांची आंध्र प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली.