Amit Ujagare
इराण विरोधात अमेरिका-इस्रायल यांनी पुकारलेलं युद्ध लवकर संपण्याची चिन्ह नाहीत. त्यामुळं आखाती देशातून होणाऱ्या कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे.
अनेक पूर्व आशियाील देशांची तेलवाहू जहाजं इराणं नियंत्रण असलेल्या हॉर्मुजच्या सामुद्रधुनीत अडकून पडली आहेत. भारतीय जहाजांची देखील हीच अवस्था बनली आहे.
हॉर्मुजच्या सामुद्रधुनीची रुंदी २१ ते २३ किमी आहे. या भागातून तेलवाहू, मालवाहू जहाजं जातात त्यांच्यासाठी सध्याची युद्धाची परिस्थिती जोखीमीची आहे.
हॉर्मुजच्या सामुद्रधुनीतून भारतात येणारी जहाजं कांडला (गुजरात), मुंबईच्या बंदरात दाखल होतात. त्यानंतर त्यावरील माल किंवा तेल हे देशभरात इतरत्र पाठवलं जातं.
हॉर्मुजच्या सामुद्रधुनीतून आलेल्या जहाजांना 'कांडला'पर्यंत पोहोचायला १००० ते १५५० किमी अंतर आणि ३७ तास लागतात. तर मुंबई बंदरात पोहोचायला ५३ तास लागतात.
हॉर्मुजची सामुद्रधुनीच्या मार्गे तेलवाहू जहाजं २४ ते ३१ किमी प्रतितास या वेगानं प्रवास करतात. भारतात यायला त्यांना २ ते ३ दिवस लागतात.
हॉर्मुज हा आखाती देशातून तेल वाहतूक करणारा सर्वात सोपा, जवळचा आणि कमी वेळ खाणारा मार्ग आहे, त्यामुळं भारतासाठी तो अत्यंत महत्वाचा आहे.
भारताच्या शिवालिका, नंददेवी, जग लाडकी ही तेलवाहू जहाजं नुकतीच नौदलाच्या एस्कॉर्टच्या मदतीनं भारतात दाखल झाली. पण अजुनही २२ ते २६ जहाजं या मार्गात अडकून पडली आहेत.