Rashmi Mane
पाहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने देशात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांसाठी कडक उपाययोजना केल्या आहेत.
भारत सरकारने जाहीर केले होते की पाकिस्तानी नागरिकांना सार्क व्हिसा सूट योजनेअंतर्गत (SVES) भारतात प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही. त्यामुळे पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडावा.
या घोषणेनंतर पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडला आहे. पण, अजूनही बरेच पाकिस्तानी आहेत जे अद्याप परतलेले नाहीत. मग असा प्रश्न निर्माण होतो की सरकारने ठरवलेल्या वेळेत देश सोडले नाही अशा पाकिस्तानींचे काय होईल?
पाकिस्तानी नागरिकांसाठी भारत सोडण्याची अंतिम मुदत संपली आहे. त्यामुळे मुदत ओलांडल्यानंतरही जर पाकिस्तानी नागरिक भारतात राहिले तर शिक्षा होणार आहे.
जे पाकिस्तानी नागरिक या मुदतीनंतरही भारतात राहतीत, त्यांना 3 वर्षांचा तुरुंगवास किंवा 3 लाखांचा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
1 व्हिसा जारी केलेल्या कालावधीपेक्षा जास्त काळ भारतात राहणारे लोक.
ज्या लोकांकडे वैध पासपोर्ट किंवा इतर प्रवास कागदपत्रे नाहीत.
कायद्याच्या कोणत्याही तरतुदीचे उल्लंघन करणारा कोणताही पाकिस्तानी.