WhatsApp : व्हाट्सअॅप युजर्सने व्हा सावधान ! APK फाईल्स चुकूनही करु नका डाऊनलोड

Ganesh Sonawane

WhatsApp

व्हाट्सअॅप ग्रुप्सवर सध्या गंभीर व धक्कादायक प्रकार घडत आहे. नागरिकांच्या मोबाईलमध्ये व्हायरस घुसल्यामुळे त्यांच्या नावाने अश्लील फोटो, व्हिडीओ, मेसेज आणि ऑडीओ क्लीप्स मोठ्या प्रमाणावर फॉरवर्ड केल्या जात आहेत.

WhatsApp APK Files | Sarkarnama

मोबाईलचा ताबा हॅकर्सकडे

या सायबर हल्ल्यामागे असलेल्या हॅकर्सनी नागरिकांच्या मोबाईलवर डॉट एपीके (.apk) या प्रकारातील अॅप फाइल्स पाठवल्या असून, त्या लिंकवर क्लिक केल्यास व्हायरस मोबाईलमध्ये प्रवेश करतो आणि मोबाईलचा संपूर्ण ताबा हॅकर्सकडे जातो.

WhatsApp APK Files | Sarkarnama

व्हायरस

एकदा हा व्हायरस मोबाईल मध्ये गेला की, तो आपल्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील सर्व ग्रुप्स आणि व्यक्तींना आपोआप तोच व्हायरस पाठवतो.

WhatsApp APK Files | Sarkarnama

आर्थिक नुकसान

त्यांच्याकडील बँक खात्यांची माहिती, पासवर्ड, क्रेडिट/डेबिट कार्डचे तपशील, वैयक्तिक फोटो, कौटुंबिक माहिती अशा सर्व गोपनीय बाबी सायबर गुन्हेगारांच्या हाती लागतात. परिणामी, आर्थिक आणि सामाजिक नुकसान मोठ्या प्रमाणात होण्याची भीती आहे.

WhatsApp APK Files | Sarkarnama

.apk फाईल्स, लिंकवर क्लीक नको

कोणत्याही अपरिचित लिंकवर क्लिक करू नका, विशेषतः .apk फाइल्स असतील तर अधिक सावधगिरी बाळगा.

WhatsApp APK Files | Sarkarnama

ग्रुपमधून काढून टाका

असल्या प्रकारचा मेसेज आल्यास, ग्रुप अॅडमिनने संबंधित व्यक्तीला तत्काळ ग्रुपमधून काढून टाकावे.

WhatsApp APK Files | Sarkarnama

'Delete for Everyone'

'Delete for Everyone' ही सुविधा वापरून तातडीने असे मेसेजेस हटवावेत. आपला मोबाईल हॅक झाल्याचा संशय आला तर त्वरित फॅक्टरी रिसेट करावा.

WhatsApp APK Files | Sarkarnama

सायबर गुन्हे शाखेशी संपर्क

तत्काळ सायबर गुन्हे शाखेशी संपर्क साधा आणि आपल्या मोबाईलची तपासणी करून घ्या.

WhatsApp APK Files | Sarkarnama

NEXT : ‘ऑपरेशन सिंदूर’वर तिची वादग्रस्त पोस्ट, डिलिट, माफी, अटक अन् त्सुनामी!

Sharmishta Panoli | Sarkarnama
येथे क्लिक करा