सरकारनामा ब्यूरो
केंद्रीय निवडणूक आयोगानं शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द केला आहे.
आयोगाचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
एकीकडे राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द करतानाच आयोगानं दुसरीकडे अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा बहाल केला आहे.
एखाद्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कधी दिला जातो. आणि त्यासाठी निवडणूक आयोगाचे निकष काय असतात?
विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीत त्या पक्षाला चार किंवा जास्त राज्यांमध्ये वैध मतांपैकी कमीत कमी 6% मते मिळाली पाहिजेत. लोकसभा निवडणुकीत कमीत कमी 4 जागा मिळाल्या पाहिजेत. पक्षाला कमीत कमी 4 राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळाला पाहिजे.
पक्षाला कमीत कमी 4 राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळाला पाहिजे.
प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळविण्यासाठी विधानसभा निवडणुकीत त्या पक्षाला वैध मतांपैकी कमीत कमी 6% मते आणि एकूण जागांपैकी कमीत कमी 2 जागा मिळाल्या पाहिजेत.
राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळाल्याचे फायदे :
राखीव निवडणूक चिन्ह मिळते,पक्षाच्या कार्यालयासाठी subsidized दरांमध्ये जमीन मिळते.दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओवर मोफत प्रक्षेपण होते. निवडणूक आयोगाकडून निवडणूक याद्यांचं मोफत वितरण होते.
भारतात सध्या एकणू 6 राष्ट्रीय पक्षांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आहे. त्यात बहुजन समाज पक्ष, भारतीय जनता पक्ष, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सिस्ट),काँग्रेस, नॅशनल पीपल्स पार्टी, आम आदमी पक्ष यांचा समावेश आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेससह तृणमूल काँग्रेस आणि सीपीय अर्थात भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांचा राष्ट्रीय दर्जा रद्द केला आहे.