सरकारनामा ब्यूरो
जितेंद्र आव्हाड हे महाराष्ट्रातील फायरब्रँड नेते मानले जातात तसेच त्यांची लव्हस्टोरीही इंटरेस्टिंग आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता सामंत या कामगार नेते दत्ता सामंत यांच्या भावाची मुलगी.
जितेंद्र आव्हाडांचे वडील ज्या कंपनीत कामाला होते, तेथे दत्ता सामंतांची युनियन होती. दोघेही एकमेकांसमोरच्या टेबलावर बसायचे.
दत्ता सामंत आणि जितेंद्र आव्हाड यांच्या वडिलांची चांगली मैत्री होती. जेव्हा दत्ता सामंत यांनी ठाण्याची पोटनिवडणुक लढवली तेव्हा ऋता सामंत आणि जितेंद्र आव्हाड यांची ओळख झाली.
निवडणुकीदरम्यान आव्हाड यांचं घर जेवणाचा अड्डा होता.
जेव्हा आमचं लग्न झालं तेव्हा ऋता एअर होस्टेस नव्हत्या. " १९८६मध्ये त्या एअर होस्टेस झाल्या. माझ्या पगारात राजकारण जमत नव्हतं. घर सांभाळत जितेंद्र आव्हाड यांच्या राजकारणाला साथ दिली." त्यामुळे जितेंद्र आव्हाड आजही सांगतात, “घर उभारण्यात तिचं मोठं योगदान आहे”.
"मला दिल्लीला जावं लागायचं तेव्हा ती फ्लाइट अॅडजस्ट करायची. मी युथ काँग्रेसचा अध्यक्ष झालो, एनएससीआयचा राष्ट्रीय सरचिटणीस झालो. "
जेव्हा दौऱ्यांसाठी पैसे नसायचे. त्यावेळी एक मोठी शक्ती माझ्या मागे उभी राहिली ती ऋता होती.....