Amit Ujagare
राज्य शासनानं मंत्रिमंडळाच्या बैठकीत दुसऱ्या टप्प्यातील दुष्काळी तालुक्यांची यादी जाहीर केली, यामध्ये ४० तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे.
या नव्या तालुक्यांना देखील टिअर-१ अर्थात पहिल्या टप्प्यातील २६५ तालुक्यांना ज्या १२ सवलती लागू केल्या होत्या, त्या सर्व सवलती लागू होणार आहेत.
तसंच या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या नव्या यादीत राज्यातील ६ प्रशासकीय विभागांपैकी अमरावती विभाग वगळता इतर सर्व पाच विभागातील तालुक्यांना स्थान मिळालं आहे.
नांदेड जिल्ह्यातील मुदखेड आणि मुखेड या २ तालुक्यांचा नव्यानं दुष्काळाच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.
पालघर (जव्हार, मोखाडा, तलासरी) तर रत्नागिरी (लांजा, मंडणगड, खेड) या तालुक्यांचा नव्या यादीत समावेश झाला आहे.
पुणे (आंबेगाव, जुन्नर), सांगली (शिराळा, वाळवा, खानापूर, विटा, तासगाव, कडेगाव, पलूस), सातारा (पाटण, जावळी, वाई, कोरेगाव, कराड) आणि कोल्हापूर (शाहूवाडी आणि शिरोळ).
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, चांदवड, निफाड या ३ तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या दुसऱ्या यादीत समावेश झाला आहे.
वर्धा (कारंजा), भंडारा (मोहाडी आणि तुमसर), गोंदिया (आमगाव, देवरी, सालेकसा, गोंदिया, अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी, गोरेगाव) आणि चंद्रपूर (जिवती, ब्रह्मपुरी, बल्लारपूर).