सोनिया गांधींच्या कुठल्या खुलाशांवरुन उठलंय वादळ?

Amit Ujagare

प्रणव मुखर्जी

प्रणव मुखर्जी यांची पंतप्रधान बनण्याची आकांक्षा होती. २०१० मध्ये अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्याशी मतभेदानंतर मुखर्जी यांनी हताश होऊन सोनिया गांधींना म्हटलं होतं की, कदाचित आता उच्चस्तरावर बदलाची वेळ आली आहे.

Belonging : a Journey of Love

शिखविरोधी दंगल

१९८४ मध्ये दिल्लीत उसळलेल्या शिखविरोधी दंगलीवेळी तत्कालीन लष्कर प्रमुख जनरल ए एस. वैद्य यांना ३१ ऑक्टोबर १९८४ च्या रात्रीच सैन्य तैनातीचे आदेश मिळाले होते. पण जवळची तुकडी न बोलावता त्यांनी डेहराडूनवरुन तुकडी बोलावल्यानं दंगल नियंत्रणाला उशीर झाला होता. कारण जवळच्या तुकडीत बहुतांश शिख सैनिक होते.

Belonging : a Journey of Love

ऑपरेशन 'ब्लू स्टार'

ऑपरेशन ब्लू स्टारनंतर सुवर्ण मंदिर आणि अकाल तख्तचे फोटो पाहून इंदिरा गांधींच्या डोळ्यात दुःख आणि पश्चातापाचे अश्रू होते.

Belonging : a Journey of Love

आणीबाणी अन् संजय गांधी

सोनिया गांधींनी आणीबाणीचा निर्णय चुकीचा होता असं म्हटलं आहे. तसंच इंदिरा गांधींनाही ही चूक करत असल्याची जाणीव होती पण संजय गांधी यांच्या वाढत्या दबावामुळं हा निर्णय त्यांनी घेतला. याला राजीव गांधींचा विरोध होता.

Belonging : a Journey of Love

बाबरी मशीद विध्वंस

राजीव गांधी अयोध्येत सुरु असलेल्या वादावर असा तोडगा काढला गेला पाहिजे जो कायदेशीर आणि सर्व पक्षांना मंजूर असेल. मशिदीला हात न लावता वेगळ्या ठिकाणी मंदिर बनवण्याची त्यांची इच्छा होती. पण भाजप-आरएसएसला मशीद पाडण्याशिवाय काहीच मंजूर नव्हतं.

Belonging : a Journey of Love

अण्णा हजारे

२०१२ मध्ये महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी इंडिया अगेन्स्ट करप्शन आंदोलनाचं नेतृत्व करत होते. तेव्हापासून आत्तापर्यंत या आंदोलनात सहभागी असलेल्या अनेकांनी याला भाजप-आरएसएसद्वारे संघटित आणि गुप्त समर्थन दिल्याचं सांगितलं आहे.

Belonging : a Journey of Love

नितीश कुमार

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी नितीश कुमार हे इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याच्या संधीची वाट पाहत होते. कारण सत्ताधारी भाजपच्या प्रभावाखाली ते आले होते.

Belonging : a Journey of Love

PMपदाचा त्याग

२००४ मध्ये पंतप्रधानपदाची संधी असतानाही हे पद त्यागण्यापूर्वी आपल्या मनात सुरु असलेल्या घालमेलीचाही सोनिया गांधींनी आपल्या आत्मचरित्रात उल्लेख केला आहे. आपण स्वतःहून पंतप्रधानपद सोडलं आणि मनमोहन सिंह यांची निवड केल्याचं त्यांनी लिहिलं आहे.

Belonging : a Journey of Love