Mayur Ratnaparkhe
भारतामधील सर्वात कठीण परीक्षा म्हणून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा उल्लेख होतो.
ही परीक्षा उत्तीर्ण होवून आयएएस, आयपीएस अधिकारी बनणं हे देशभरातील कोट्यवधी तरुणांचे स्वप्न असते.
दरवर्षी लाखो तरूण ही परीक्षा देतात, मात्र त्यातील काहीजणच ही परीक्षा उत्तीर्ण होतात.
देशभरात सर्वाधिक आयएएस हे उत्तर प्रदेशमधील आहेत. दरवर्षी 20-25 टक्के येथील आयएएस असतात.
तर सर्वाधिक आयएएस अधिकारी असणाऱ्या राज्यांमध्ये दुसरं स्थान बिहारचं आहे. दरवर्षी 15-18 टक्के येथील आयएएस असतात.
याशिवाय राजस्थान आणि तामिळनाडू या राज्यांमधूनही मोठ्याप्रमाणात आयएएस अधिकारी असतात. राजस्थानामधून 5-8 टक्के, तामिळनाडूमधून 5-7 टक्के आयएएस येतात.
याच्या खालोखाल आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या राज्याचा आयएएस अधिकाऱ्यांच्या संख्येत क्रमांक लागतो. या ठिकाणी 5-6 टक्के आयएएस असतात.
महाराष्ट्रातून 4-5 टक्के अन् पंजाबमधून 3-5 टक्के आयएएस असतात.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
NCP Sharad Pawar : कोण आहेत दुसऱ्या यादीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षातील उमेदवार?