Amit Ujagare
Block Level Officer (BLO) म्हणजे निवडणूक आयोगाची प्रतिनिधी असतो. ही व्यक्ती तळागळातील लोकांशी संपर्क करुन मतदार यादी अपडेट करण्याचं काम करते. त्यासाठी घरोघरी जाऊन त्यांना माहिती घेऊन यादी अपडेट करायचं काम करावं लागतं.
सरकारी किंवा निमसरकारी कर्मचारीच स्वयंसेवक पद्धतीनं BLO साठी अर्ज करु शकतात. निवडणूक आयोगानं ठरवलेल्या निकषात ती बसत असेल तर तिची या पदासाठी नियुक्ती होते.
एका BLOचं कार्यक्षेत्र हे एक किंवा दोन मतदार केंद्र इथंपर्यंत मर्यादित असतं. BLO हे निवडणूक आयोगाचे पूर्णवेळ कर्मचारी नसतात.
रिप्रेझेंटेशन ऑफ पिपल्स अॅक्ट, १९५० च्या कलम १३ ब (२) नुसार, BLO ची नियुक्ती केली जाते. सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी असलेल्या १३ प्रकारच्या विभागातील व्यक्ती BLO होऊ शकतात.
यामध्ये शिक्षक, अंगणवाडी कर्मचारी, पटवारी, ग्रामसेवक, ग्रामपातळीवरील कर्मचारी, लाईट मीटरचे रिडिंग घेणारे, पोस्टमन, नर्सेस, आरोग्य कर्मचारी, मध्यान्ह भोजन कर्मचारी, कंत्राटी शिक्षक, पालिकेतील कर संग्राहक तसंच शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे कारकून यांचा समावेश असतो.
निवडणूक काळात BLO ना सुट्टी घेता येत नाही, पण ते ज्या मूळ विभागात काम करत आहेत, तिथून त्यांना निवडणूकीचं काम करण्यासाठी कामामधून सवलत दिली जाते.
BLOs ना किमान दोन मतदान केंद्रांसाठीच्याच वार्षिक ३,००० रुपये मानधन निश्चित केलेलं असतं. तसंच यापेक्षा जास्त कामाची जबाबदारी दिल्यास ७५० रुपये वार्षिक दिले जातात. त्याहीपेक्षा अधिकच काम जर आयोगानं दिलं तर त्यासाठी वार्षिक अतिरिक्त ३,००० रुपये मानधन दिलं जातं.
त्याचबरोबर मतदारयादीतील पर्मनन्ट इलेक्टोरल रोलमधील (PER) फोटो एन्ट्रीसाठी ४ रुपये (जर PER एन्ट्री ९० टक्क्यांहून कमी असेल तर) तसंच एका फोटो एन्ट्रीसाठी ५ रुपये (जर PER एन्ट्री ९० टक्क्यांहून अधिक असेल तर), असंही मानधन BLOs दिलं जातं.