Rashmi Mane
मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी चळवळीच्या माध्यमातून गेल्या १० ते १५ वर्षापासून मनोज जरांगे पाटील काम करत आहेत.
मनोज जरांगे बीडमधील मातोरी गावचे आहेत. पण काही वर्षांपूर्वी ते जालना जिल्हातील अंबडमधील अंकुशनगर येथे स्थायिक झाले.
मनोज जरांगे यांचं शिक्षण 12 वी पर्यंत झालंय.
मनोज जरांगे २०११ पासून मराठा आरक्षण चळवळीत सक्रीय आहेत. बघता बघता मराठा समाजातील लढवय्या नेता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
पत्नी, चार मुलं, तीन भाऊ आणि आई-वडील असं मनोज यांचं कुटुंब आहे.
हॉटेलमध्ये काम करत त्यांनी समाजकार्यात स्वतःला झोकून दिले. स्वतःच्या मालकीची चार एकर जमीनही त्यांनी मराठा आंदोलनासाठी विकली.
जरांगे यांनी 2011 ला 'शिवबा' संघटनेची स्थापना करत, मराठा समाजासाठी अनेक आंदोलने केली आहेत.