BBC Documentary: बीबीसी डॉक्युमेंट्रीवरील बंदी विरोधात सर्वोच्च न्यायालयात गेलेले तीन लोक कोण आहेत?

सरकारनामा ब्यूरो

"इंडिया द मोदी क्वेश्चन" ही बीबीसीची डॉक्युमेंटरी प्रदर्शित झाल्यापासून वादात आहे.

BBC Documentary | Sarkarnama

केंद्र सरकारने ही डॉक्युमेंटरी यूट्युबवरुन हटवली असून ट्विटरवरदेखील कुणी प्रसारित करू नये अशी बंदी घालण्यात आली आहे.

BBC Documentary | Sarkarnama

केंद्र सरकारकडून घालण्यात आलेल्या डॉक्युमेंटरीवरील बंदीचे प्रकरण थेट कोर्टात पोहोचले असून सर्वोच्च न्यायालयाने याबाबत केंद्र सरकारला नोटीस पाठवली आहे. 

BBC Documentary | Sarkarnama

2002 च्या गुजरात दंगलीवर बीबीसीने प्रदर्शित केलेल्या माहितीपटावर देशात बंदी घालण्यात आली. त्या विरोधात भारतातील तीन प्रसिद्ध व्यक्तींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

BBC Documentary | Sarkarnama

यापैकी एक नाव म्हणजे पश्चिम बंगालमधील कृष्णनगर येथील तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा.

BBC Documentary | Sarkarnama

दुसरे नाव म्हणजे प्रशांत भूषण हे सर्वोच्च न्यायालयाचे सुप्रसिद्ध ज्येष्ठ वकील आहेत. 2011 मध्ये अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचाराविरोधातील आंदोलनामुळे ते प्रसिद्ध झाले.

BBC Documentary | Sarkarnama

काही काळ त्यांनी 'आप'मध्ये कार्यरत होते, परंतु काही वर्षानंतर त्यांनी पक्ष सोडला.

BBC Documentary | Sarkarnama

तिसरे नाव म्हणजे ज्येष्ठ पत्रकार 'एन राम' हे द हिंदू पब्लिशिंग ग्रुपचे संचालक आणि द हिंदू या इंग्रजी वृत्तपत्राचे संपादक होते. एन राम यांनीही बीबीसी माहितीपटावरील बंदीविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. "हे सर्वसामान्यांच्या माहितीच्या अधिकाराचे उल्लंघन असल्याचे त्यांनी म्हटले आहे."

BBC Documentary | Sarkarnama

बीबीसीच्या डॉक्युमेंटरीबाबत न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि एमएम सुंदरेश यांच्या खंडपीठासमोर दोन याचिका आज सुनावणीसाठी घेण्यात आल्या. आता या प्रकरणी एप्रिलमध्ये सुनावणी होणार आहे. 

BBC Documentary | Sarkarnama
येथे क्लिक करा