Ganesh Thombare
शिवसेना पक्षाचा आज 57 वा वर्धापनदिन साजरा होत आहे.
शिवसेना हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे.
शिवसेना या पक्षाची स्थापना बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 साली केली.
शिवसेनेच्या स्थापनेवेळी शिवसेना हे नाव प्रबोधनकार ठाकरे यांनी सुचवलं होतं.
मराठी माणसांच्या न्याय हक्कांसाठी आणि हिंदुत्वाच्या मुद्यांवर आवाज उठवणारा पक्ष म्हणून शिवसेनेकडे पाहिलं जातं.
महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना या पक्षाने राजकारणात मोठा ठसा उमटवला आहे.
30 ऑक्टोबर 1966 साली शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा शिवाजी पार्कवर झाला.
2003 मध्ये महाबळेश्वरच्या अधिवेशनात शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंची निवड झाली.
17 नोव्हेंबर 2012 ला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव यांच्याकडे शिवसेनेची सूत्रे आली.
17 फेब्रुवारी 2023 च्या निवडणूक आयोगाच्या निकालानुसार शिवसेना हा पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे गेला.