सरकारनामा ब्यूरो
अद्वय हिरे हे माजी मंत्री प्रशांत हिरे यांचे पुत्र तसेच माजी आमदार अपुर्व हिरे यांचे भाऊ आहेत.
महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देणारे व संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या चळवळीत महत्वाची भूमिका बजावणा-या भाऊसाहेब हिरे या घराण्याचा राजकीय वारसा त्यांना लाभला आहे.
नाशिक जिल्ह्यातील हिरे घराण्याच्या चौथ्या पिढीचे नेतृत्व ते करीत आहेत.
अद्वय हिरे २००९ पासून भाजपमध्ये आहेत. गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्त्वात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
डॉ.हिरे हे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर जिल्हा कृषी औद्योगिक संघाचे चेअरमनदेखील आहेत.
पक्ष बदलण्याची ख्याती असलेल्या हिरे कुटुंबीयांनी अनेक वेळा पक्ष बदलला आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात दबदबा निर्माण करणारे नाशिक येथील हिरे घराणे मूळचे काँग्रेसी. त्यांच्या वडिलांनी देखील १९९५ मध्ये राज्यात भाजप-सेना युती सत्तेत आल्यावर काँग्रेसचा त्याग करत शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेतले होते.
वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत, अद्वय यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. दादर येथील शिवसेना भवनात उद्धव ठाकरे, संजय राऊत, विनायक राऊत आणि अरविंद सावंत यांच्या उपस्थितीत अद्वय हिरे यांनी प्रवेश केला.